सोलापूर जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एकला राष्ट्रीय पुरस्कार
सोलापूर दि. २२० दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यातील पत संस्थेने केलेल्या विविध सामाजीक क्षेत्रात उल्लेखनिय काम केले बददल माहिती मागविली होती. संस्थेने करोना काळात एक लाख एक हजार आकरा सॅनिटायझर्स च्या वाटल्या वितरीत केल्या, सांगली येथील पुरग्रस्त शाळेस शालेय कीट वाटप केले. जिल्हा अधिकारी यांनी केलेल्या आव्हानानुसार अन्नधान्य वाटप केले. जिल्हा परिषदेच्या करोना दवाखान्यासाठी ५० कॉट, गादी, बेड शीट, चादरी यांचे वाटप व दिनदर्शिकेत सामाजीक समस्यावर आधारीत जन जागृती, संस्थेच्या अहवालात सामाजीक उपदेश, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर या वर्षी संविधान यास ७५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल सदर ची माहिती कयू आर कोड मध्ये संस्थेच्या दिनदर्शिकेत प्रकाशित केली असे अनेक उपक्रम राबविले याची जनसंपर्क अधिकारी राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती गोवा यांनी दखल घेऊन जिल्हा परिषद कर्म सहकारी पत संस्था नियमित नं. १ सोलापूर या संस्थेस नामांकित घोषित केलेचे पत्र दि. १५.४.२०२५ रोजी संस्थेस प्राप्त झाले. सदर पुरस्कार वितरण सोहाळा दि.२७.४.२०२५ रोजी रविंद्र भवन सांखळी गोवा येथे दुपारी १२ वाजता संपन्न होणार आहे.
सदर पुरस्कारामध्ये विशेष प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, म्हैसुर फेटा, चंदनाचा कायस्वरूपी हार व भारत सरकारचे केंद्रिय मंत्री यांचेकडून अभिनंदन पत्र प्रदान करण्यात येणार असलेचे चेअरमन डॉ. एस. पी. माने यांनी या प्रसंगी सांगीतले. सदर चा पुरस्कार हा संस्थेचे माजी चेअरमन व विदयमान संचालक कै. विवेक लिंगराज यांनी राबविलेल्या वरील विविध योजनेमुळे मिळाला सदर विविध योजना रावविण्याची संकल्पना त्यांचीच होती त्यामुळे मी हा पुरस्कार विवेक लिंगराज यांना संर्मपीत करीत आहे.
हा पुरस्कार हा मानाचा तुरा असलेचे चेअरमन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विषद केले. त्यामुळे आपणांस व सर्व संचालक मंडळास उर्जा मिळाली व चांगले काम केलेचे चिज झाले. राष्ट्रिय पुरस्कार संस्थेस मिळणे ही सर्व सभासदांना व संचालक मंडळास अभिमानाची गोष्ट असलेचे विचार संस्थेचे मार्गदर्शक पंडीतराव भोसले यांनी यावेळी बोतलताना विषद केले.
या पत्रकार परिषदेस संस्थेचे मार्गदर्शक अशोक भोसले, व्ही. आर. गरड, व्ही. डी. नवले, प्रकाश शेटे, वी.टी. मोहिते, दयानंद परिचारक व्हा. चेअरमन सुरेश कुंभार संचालक विष्णु पाटील, शहाजहान तांबोळी, श्रीधर कलशेटटी, तजमुल मुतवल्ली, विजयकुमार धेरडे, विशाल घोगरे, गजानन मारडकर, शिवानंद म्हमाणे, शिवाजी राठोड, किरण लालबोंद्रे, विकास शिदे, चेतन वाघमारे, सौ. मृणालिनी शिंदे, श्रीमती स्वेता राऊत तज्ञ संचालक श्रीशैल देशमुख, नितीन शिंदे सचिव डी. एल. देशपांडे लेखनिक अशोक पवार, सुभाष काळे, नितीन येमुल, विनोद कदम आदी उपस्थित होते.