“माझ्या पैशाची दारू पीत आहे, तुझ्या बापाची पीत नाही” सोलापुरात पोलिसाची गच्ची पकडून मारहाण
सोलापूर : रात्रीच्या सुमारास चार चाकी वाहनामध्ये दारू पिताना पोलिसांनी हटकले असता त्याच पोलिसांना उलट गच्ची पकडून उद्धट बोलून मारहाण केल्याची घटना सोलापुरातील साखरपेठ परिसरात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
जेलरोड पोलीस ठाण्याचे चालक पोलीस कॉन्स्टेबल कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण श्रावण क्षीरसागर, वय-३२ वर्षे, राहणार इंदिरा वसाहत भवानी पेठ व लकी भिमराव गायकवाड, जुना तुळजापूर नाका सोलापूर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी पीसीआर-१ मधून पोलीस हवालदार मेडके, पुरूष होमगार्ड शेख असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना नमुद आरोपीत मजकूर हे इर्टीगा कार क्र एमएच १३ सी के १६८३ मध्ये दारू पित असताना मिळून आले. त्यास त्याबाबत विचारणा केली असता “माझ्या पैशाची दारू पित आहे, तुझ्या बापाची पित नाही” असे रांगात बोलून त्याचे कारमधून उतरून फिर्यादीची वर्दीची गच्ची पकडून ओढून पीसी आर मोबाईल मधून बाहेर काढले व हाताने गालावर मारले तसेच धक्काबुक्की करून दुखापत केली आहे. फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणुन मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ढेरे हे करीत आहेत.