महिला दिन झाला असा साजरा ; सर्व क्षेत्रातील महिलांचा सत्कार, राष्ट्रवादीच्या उज्वला पाटील यांचा उपक्रम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व खासदार सूनिल तटकरे, महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर व सोलापूर निरीक्षक दिपाली पांढरे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष उज्वला पाटील यांनी महिला दिन थाटात साजरा केला.



महिला दिनानिमित्त ‘गाथा सन्मानाची महिला सन्मान सोहळा’ घेण्यात आला. त्यावेळेस डाॅक्टर, सिस्टर, आशावकँर, परिचारिका, पत्रकार, वाहनचालक, वकिल, शिक्षिका, पोलिस, एक्साईज, अंगणवाडी, नर्स, मदतनीस, सिआरपी होमगार्ड, स्वच्छता कर्मचारी, खेळाडू, शेत कामगार, उद्योजक, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, नगरसेवक, मुख्याध्यापिका, ब्युटी पार्लर, निवेदिका, पिग्मी एजंट, एस आर पी एफ कॉन्स्टेबल, न्युट्रीशीशन, इंजिनिअर अशा सर्व क्षेत्रातील महिलांचा व बचत गटातील सर्व पदाधिकाऱ्यांसह महिलांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात कृषी बाजार समिती माजी संचालक अविनाश मार्तंडे, जिल्हा परिषद माजी सदस्या ज्योती मार्तंडे, संभाजी आरमार अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, मंडल अधिकारी कन्याकुमारी भोसले, माजी नगरसेविका मंदा तोडकरी, उत्तर तालुका कार्याध्यक्ष राणी डोंगरे, भोगाव सरपंच सुनिल भोसले, समाज सेविका अलका भवंर, माजी जिल्हाध्यक्षा विदया शिंदे, पक्षाच्या नागर चवरे, रुक्मिणी जाधव, किरण मोहिते, राणी पवार ह्या सर्व मान्यवर मंडळीच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा पार पडला.