100 किलो हार, 51 किलो केक, लक्षवेधी फ्रेम अन् हलगीचा कडकडाट ; सोलापूरचे युवराज भैय्या रामभाऊंच्या वाढदिवस सत्काराला
सोलापूर ; माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषमय वातावरणात माळशिरस तालुक्यातील मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी संपन्न झाला.
बंजारा समाजाचे नेते, सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष, आधार हॉस्पिटलचे चेअरमन युवराज राठोड यांनी सोलापूरहून आपले मित्र माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसाच्या सत्काराला उपस्थिती लावली.
तब्बल शंभर किलो गुलाबाचा हार, पन्नास किलोचा केक अन् संघर्ष योद्धा अशा नावाची मोठी फ्रेम हलगीच्या कडकडाटासह सोबत कार्यकर्त्यांचा जथ्था घेऊन युवराज दाखल झाले.
यावेळी रामभाऊ सातपुते यांचा तो भव्य हार घालून आणि केक कापून सत्कार करण्यात आला. यावेळी सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते याही उपस्थित होत्या त्यांचाही सत्कार सोनाई फाउंडेशन च्या वतीने करण्यात आला.
यावेळी पीपी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद पवार, माळप्पा गब्यार, अकबर शेख, गणेश कुऱ्हाडे, धनराज कटकम, अमोल दळवी, अमोल गायकवाड, राम पवार, श्याम गायकवाड, सिद्धू गब्यार, महेंद्र चव्हाण, अजित राठोड, मुस्ताक शेख, रवी राठोड, शंकर चव्हाण, राजू कुऱ्हाडे, विजय पर्चंडे, रियाज अत्तार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.