सोलापूर झेडपीचे कुलकर्णी झाले नंबर वन ; झेडपीत पडणार पेढ्यांचा पाऊस
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याकडे बांधकाम विभाग क्रमांक एकचा पदभार देण्यात आला आहे त्यामुळे दोन नंबरचे कुलकर्णी हे आता एक नंबर झाल्याचे चर्चा झेडपी मध्ये ऐकण्यास मिळाली.
तब्येतीच्या कारणामुळे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे हे काही दिवस रजेवर गेले आहेत त्यामुळे त्यांचा पदभार संतोष कुलकर्णी यांच्याकडे आला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सोमवारी सायंकाळी तसे आदेश काढले.
काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी लिपिक वर्गातील पदोन्नती पात्र 31 कर्मचाऱ्यांचे समुपदेशन घेऊन त्यांना पदोन्नती दिली होती त्या निर्णयाचे सर्वच कर्मचारी आणि संघटनांमधून स्वागत करण्यात आले जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदाच असे घडले अशा भावना व्यक्त करण्यात आल्या दरम्यान आता मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम हे पुन्हा कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणार आहेत. सुमारे 60 हून अधिक जिल्हा परिषदेतील शिपाई यांची पदोन्नती होणार असून ते कनिष्ठ लिपिक होणार आहेत. त्यामुळे निश्चितच जिल्हा परिषदेमध्ये पेढ्यांचा पाऊस पडेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

सोमवारी सीईओ जंगम यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळीही कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना समुपदेशन द्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक होणार असल्याचे ते म्हणाले.
मागील दोन ते तीन वर्षांपासून कर्मचारी हे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांना शिक्षण असून क्लार्क होता आले नव्हते त्यामुळे आता त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये समुपदेशनानेच पदोन्नती होणार असल्याचे सीईओ जंगम म्हणाले.