सोलापूरच्या DCP दिपाली काळे व PI महादेव राऊत यांना हा पुरस्कार जाहीर
सोलापूर : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे आयोजित “बालस्नेही पुरस्कार २०२४” या पुरस्काराकरिता डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), सोलापूर शहर यांना उत्कृष्ट पोलीस उप-आयुक्त म्हणून जाहीर झाला आहे. तसेच महादेव राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सोलापूर शहर यांना “बालस्नेही पुरस्कार २०२४” उत्कृष्ट पोलीस निरीक्षक या प्रकारात गुन्हे शाखा, सोलापूर शहर विभागातून जाहीर झाला आहे.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार सोलापूर शहर यांच्या नेतृत्वाखाली बालकांच्या संरक्षणार्थ केलेल्या कारवाईबद्दल महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र शासन यांनी दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केला आहे.
सदर पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई येथे दिनांक ०३/०३/२०२५ रोजी दुपारी १ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.