खासदार प्रणिती शिंदे यांनी विमानसेवेवरून केले भाजपला चॅलेंज ; काँग्रेस पक्षाकडून सोलापुरात….
सोलापूर : मागील सहा महिन्यांपासून आम्ही आकाशाकडे पाहतोय सोलापूरातून विमान कधी उडणार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन विमानतळाचे लोकार्पण केले, पण विमानसेवा काही सुरू झाली नाही. मी देशाचे नागरी उड्डाण मंत्री यांच्याशी चर्चा करून विमानसेवा सुरू करण्याबाबत मागणी केली, आम्ही विमानसेवेसाठी प्रयत्न करतोय परंतु इगो’चा प्रश्न येतो, त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न होतो. येत्या काही दिवसात काँग्रेस पक्षाकडूनच विमानसेवा सुरू होईल असे सांगताना सत्ताधाऱ्याने अडथळे नाही आणले तर असेही काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले, त्यांना विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम करायचे होते परंतु लाडकी बहीण पुढे आणून त्यांनी जे करायचे ते केले. राज्य सरकारची आर्थिक तिजोरी अडचणीत आल्याने आता या योजनेतील नऊ लाख लाभार्थी कमी होणार असल्याचे समजते. एकही योजना व्यवस्थित राबवली जात नसल्याची टीका त्यांनी केली.