सोलापूरच्या विमानसेवा बाबत महत्त्वाचे अपडेट ; जिल्हाधिकारी म्हणाले, 48 सीटर विमान ऐवजी आता…
सोलापूर : सोलापूरची विमानसेवा कधी सुरू होणार याकडे सर्वसामान्य सोलापूरसह राजकीय लक्ष ही लागून राहिले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानसेवा सुरू होण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु काही तांत्रिक कारणास्तव विमान सेवेसाठी विलंब होत आहे.
सोलापूरच्या नूतनीकरण केलेल्या विमानतळाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले तेव्हापासून सोलापूरकर विमानसेवेच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही सोलापूरची विमान सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सोमवारी माध्यमांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना विमानसेवा संदर्भात विचारले असता त्यांनी माहिती दिली की, डीजीसीए ने 48 सीटर विमानासाठी परवाना दिला होता पण आता 72 सीटरच्या विमानासाठी री सर्टिफिकेशन परवाना मिळण्यासाठी प्रलंबित आहे. यासाठी लागणारे जे जे कागदपत्रे आहेत ते डिसेंबर मध्येच सोलापूर विमानतळ प्रशासनाने डीजीसीए कडे दिले आहेत. त्यावर कार्यवाही प्रलंबित असून लवकरात लवकर डीजीसीए कडून रिसर्टिफिकेशन परवाना मिळेल अशी अपेक्षा आशीर्वाद यांनी व्यक्त केली.