दादाई संस्थेच्या वतीने शिवजयंती साजरी ; महिलांना दिला सन्मान
सोलापूर : दादाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था संचलित राजे प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिनांक १८ फेब्रुवारी रोजी दादाई संस्थेच्या मार्गदर्शिका अंजना जाधव व सविता जाधव यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
विमुक्त भटका झोपडपट्टी, शहा नगर, लिमयेवाडी, सेटलमेंट कॉलनी नंबर एक भागातील सर्व माता भगिनींचा या वेळी फेटा बांधून सन्मान करण्यात आला. सर्व उपस्थितांच्या हस्ते महाराजांची आरती करण्यात आली.
त्यावेळी श्रीमती निर्मला गायकवाड, अर्चना युवराज जाधव, निकिता गायकवाड, पुनम जाधव, सुवर्ण गायकवाड, अमृता जाधव, वृषाली गायकवाड, लक्ष्मी गायकवाड, संगीता सातपुते, संयुक्ता गायकवाड, मनीषा गायकवाड, कांचन जाधव, रत्नमाला जाधव, प्रतीक्षा गायकवाड, सोनाली गायकवाड, ज्योती देगाव, रीना गायकवाड, विमल जाधव, यलुबाई गायकवाड, प्रिया गायकवाड, आशा पवार यावेळेस आधारस्तंभ नारायण जाधव, संस्थापक अध्यक्ष युवराज जाधव, उत्सव अध्यक्ष आशिष गायकवाड, उपाध्यक्ष कुणाल जाधव, संतोष गायकवाड, यश गायकवाड, विवेक जाधव, सागर गायकवाड, संस्थेचे सल्लागार कृष्णा जाधव, भारत गायकवाड, आनंद गायकवाड, अनिल गायकवाड, निरज जाधव, संदीप गायकवाड, महेंद्र कोपनर, मोहसीन शेख, अर्जुन शिंत्रे, अजहर शेख, युनूस शेख, मंगेश गायकवाड, श्रीकांत पवार, आकाश गायकवाड आदीसह माता भगिनी युवा शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.