लाडक्या लेकीचा वाढदिवस केला असा साजरा ; प्रमोद आवताडे त्यांचा असाही आदर्श
सोलापूर : एकुलती एक मुलगी आणि तिचा वाढदिवस म्हणजे मोठा खर्च करून जंगी साजरा केला जात असल्याचे पाहायला मिळते. परंतु प्रमोद आवताडे यांनी आपल्या लाडक्या लेकीचा वाढदिवस गरजू रुग्णांच्या नातेवाईकांसोबत साजरा करत वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत केला.
श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रमोद शिवाजी आवताडे यांची एकुलती एक कन्या देविका प्रमोद आवताडे हिच्या दुसऱ्या वाढदिवसा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय सोलापूर येथे गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना नाश्ता वाटप करण्यात आला. जनसेवा रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून संस्थेच्या माध्यमातून सातत्याने मदतीचे कार्य सुरू असते.
यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष प्रा प्रमोद आवताडे, उपाध्यक्ष हनुमंत निकम,
मोनिका आवताडे, स्वाती निकम व इतर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.