अमृता फडणवीस यांचे सोलापूरच्या बंजारा समाजातून का होतयं कौतुक ; युवराज राठोड करणार जाहीर सत्कार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्धांगिनी अमृता फडणवीस यांनी बंजारा समाजाचे दैवत संत श्री सेवालाल महाराज यांचे बंजारा वेशभूषेत व बोलीभाषेतील गीत व नृत्य सादर केले आहे. त्याबद्दल संपूर्ण बंजारा समाजातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारतीय जनता पार्टीने पोहरा देवीचे महंत बंजारा धर्मगुरू बाबूसिंह महाराज यांना विधान परिषदेवर आमदारकी दिल्याने समाजातून त्याचे स्वागत करण्यात आले. तसेच आता सौभाग्यवती मुख्यमंत्र्यांनी बंजारा वेशभूषेत नृत्य आणि गीत सादर केल्याने त्याबद्दल ही समाजातून कौतुक केले जात असून बंजारा वर्ल्ड चॅनलच्या अनिता राठोड यांना अमृता फडणवीस यांचे मेकअप आणि वेशभूषा करण्याची संधी मिळाली.
आजपर्यंत संत श्री सेवालाल महाराज यांचे गाणे कधीही टी सिरीज चैनल वर टाकण्यात आले नव्हते परंतु अमृता फडणवीस यांच्या माध्यमातून हे गाणे प्रसिद्ध झाले आणि पुन्हा एकदा बंजारा समाजाची संस्कृती शिखरावर पोहोचली. याबद्दल सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी 15 फेब्रुवारी बंजारा समाजाच्या आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंतीचे औचित्य साधून लवकरच त्यांची वेळ घेऊन अमृताताई यांचे तमाम बंजारा समाजाच्यावतीने भव्य सत्कार सोलापूर येथे करण्यात येणार आहे असे सांगितले आहे.
तसेच तमाम बंजारा समाजाच्या वतीने अमृता फडणवीस यांचे कोटी कोटी आभार असून हमार संस्कृती, हमारो अभिमान जय सेवालाल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.