मुख्यमंत्री, आम्हाला मुदतवाढ द्या ! सोलापुरात शेकडो युवकांचे आत्मक्लेष आंदोलन
सोलापूर : कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीने लागलेल्या युवकांनी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आत्मक्लेष आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधले. आम्हाला मुदतवाढ द्या ही एकमेव मागणी ही आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे. समन्वयक सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
सहा महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये राज्यातील लाखो बेरोजगार युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने मासिक मानधनावर शासकीय कामकाजाचे प्रशिक्षण घेण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती.
आता या युवकांचा सहा महिन्याचा कार्यकाळ संपत आहे त्यामुळे पुन्हा या सरकारने मुदतवाढ द्यावी यासाठी हे युवक आंदोलनाला बसले आहेत.