उमेश पाटील पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल ; कुठे झाला हा प्रवेश
सोलापूर : मोहोळ तालुक्याचे नेते उमेश पाटील हे पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. मंगळवारी मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मंत्री, आमदारांच्या उपस्थितीत उमेश पाटील यांचा प्रवेश झाला. अजित पवारांनी स्वतः उमेश पाटलांच्या गळ्यात घड्याळाचा शेला घालून स्वागत केले.
या पक्षप्रवेशानंतर उमेश पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर ही पोस्ट केली आहे.
विधानसभा निवडणुकी पुर्वी मी माझ्या पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता.परंतु इतर कुठल्याही पक्षात प्रवेश केला नव्हता.सोलापुर जिल्ह्यातील “मोहोळ विधानसभा” या राखीव मतदारसंघा मधील मातब्बर प्रस्थापित नेत्या सोबत टोकाचे मतभेद झाल्यामुळे मी नाईलाजाने पक्ष त्याग केला होता.मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनता अजितदादांच्या नव्हे तर तिथल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात होती हे निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवण्याची आवश्यकता होती.त्यामुळे मी व माझ्या सर्वपक्षीय सहका-यांनी मिळुन 15 दिवसात स्वतःचा उमेदवार देऊन (राजू खरे) विधानसभेला 30 हजार मताधिक्याने निवडून आणला.अजित दादांनी उमद्या मनाने स्वत:च्या पक्षाचा आमदार पडला तरी माझ्या जिगरबाज लढाऊ बाण्याचे कौतुक केले.मी दादांना कधी सोडले नव्हते.फक्त एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता इरेला पेटला तर अपराजित मातब्बर नेत्याला देखिल पराभूत करू शकतो हे सिद्ध करायचे होते.माझा देवगिरी येथे सर्व मंत्री,आमदार व पार्थ दादा पवार यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या हस्ते झालेला पुन्हा पक्ष प्रवेश ही तांत्रिक बाब आहे.मी कधीही अजितदादांना सोडले नव्हते…फक्त थोडे दिवस पक्षातून रजा घेतली होती..इतकच