पालकमंत्र्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाहणीत कौतुक ; नंतर सोलापूर झेडपीचे हे मात्र आवडले बाबा !
सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रशासनावर आणि राजकीय नेत्यांवर आपली छाप टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कामचुकार अधिकाऱ्यांना दमबाजी करत त्यांनी आपली पकड निर्माण केली असून आपला दौरा कॅन्सल करत नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना तब्बल तीन तास त्यांनी शासकीय विश्रामगृहावर वेळ दिल्याचे पाहायला मिळाले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी शेजारीच असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला भेट दिली. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचे दालन, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय, आपत्ती नियंत्रण कक्ष तसेच प्रवेश केल्यानंतर अभ्यासासाठी ठेवण्यात आलेल्या रजिस्टरची पाहणी केली.
या भेटीमध्ये पालकमंत्र्यांनी आवर्जून नागरिकांना आसन व्यवस्था, पाण्याची सोय आणि स्वच्छतागृहाची सोय आहे का? हे विचारत माहिती घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेली नागरिकांची व्यवस्था व सोय पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
जवा पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालय पाहत होते त्याच वेळेस सोलापूर झेडपी मध्ये पळापळ सुरू झाली की पालकमंत्री अचानक झेडपी ला भेट देणार सर्वच विभाग अलर्ट झाले अर्धा तासानंतर समजले की पालकमंत्री येणारच नाहीत पालकमंत्री जयकुमार गोरे पुढील दौऱ्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भेट आणि आढावा घेण्याची शक्यता आहे तसे त्यांनी नियोजन समितीच्या बैठकीत ही बोलून दाखवले.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मागील काही महिन्यांपासून अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश केला असता पोर्चच्या आत मध्ये नागरिकांसाठी बसण्याची चांगल्या पद्धतीने असून व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले. त्याचबरोबर त्या ठिकाणी नागरिक बसण्याची व्यवस्था आहे तिथेच त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर हा बदल निश्चितच जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्यांना आवडणारा असेल. पालकमंत्री कधीही येतील त्यामुळे जिल्हा परिषदेने नागरिकांसाठी ही व्यवस्था केल्याचे दिसून आले.