सोलापूर : काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी काँग्रेस भवनात सायंकाळी भेट दिली. संपूर्ण काँग्रेस भवन फिरून त्यांनी पाहिले. त्यानंतर साहेबांनी बराच वेळ उपस्थित सर्व युवा कार्यकर्त्यांची चर्चा केली वोट यंत्रणेची सविस्तर माहिती घेतली.
याचवेळी एक युवा कार्यकर्ता इलियास शेख हा आला त्याची ओळख शहराध्यक्षांनी करून दिली. यावेळी त्या युवकाने शेरोशायरी च्या माध्यमातून सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला. हे पाहून साहेबांनीही तितकीच भरभरून दाद दिली..