सोलापूरकरांच्या जंगी स्वागताने ‘जया भाऊ’ भारावले ! पालकमंत्री गोरेंनी स्वीकारल्या सर्वांच्याच शुभेच्छा
सोलापूर : जिल्ह्याचे नवे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांचा पहिलाच सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा दौरा गुरुवारी संपन्न झाला नव्या पालकमंत्र्याचे सोलापूरकरांनी प्रचंड आणि जंगी स्वागत केले अनेक ठिकाणी क्रेनने त्यांना हार घालण्यात आला. त्यामुळे जया भाऊ सोलापूरकरांचे प्रेम आणि शुभेच्छा पाहून अक्षरशः भारावून गेले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा दौरा माळशिरस तालुक्यातून सुरू झाला. सुरुवातीलाच नातेपुते या ठिकाणी माजी आमदार रामभाऊ सातपुते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात आगमन होताच त्यांना क्रेनने हार घालून जंगी स्वागत केले. त्यानंतर मांडवे येथील सातपुते यांच्या निवासस्थानी स्वागत झाले, पुढे माळशिरस शहर आणि वेळापूर या ठिकाणीही कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
पंढरपूर शहरात आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली.
पुढे मोहोळ मध्ये उमेश पाटील आणि संतोष पाटील या बंधूंनी सावली या निवासस्थानी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भव्य दिव्य आणि क्रेनने हार घालून स्वागत आणि सत्कार केला.
सोलापूर शहरात एन्ट्री होतास शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्ह्याचे अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहा बाहेर प्रशासनाने सुद्धा त्यांचे जोरदार स्वागत केले. प्रशासकीय आढावा बैठक संपल्यानंतर त्यांच्या सत्काराला मोठी गर्दी झाली होती. प्रत्येकांचा सत्कार त्यांनी आदरपूर्वक स्वीकारला.
दरम्यान धनगर समाजाचे अमोल कारंडे, माऊली हळनवर, यतिराज होनमाने यांच्यासह समाज बांधवांनी धनगरी ढोल वाजवत पालकमंत्र्याच्या स्वागताला थांबले होते त्याच वेळी ही माहिती राम सातपुते यांना समजल्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी नेऊन त्यांचे स्वागत घडवून आणले.
दमानी नगर भागात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा ताफा थांबवून आपल्या आंबेडकरी स्टाईलने सत्कार केला. यावेळी माजी आमदार रामभाऊंनी आनंददादांची चांगलीच ओळख करून दिली.