सोलापुरात भाजपच्या पैलवानानं अखेर मारलं मार्केट
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापुरात पहिल्याच दौरा असल्याने त्यांच्या स्वागताचे बॅनर शहरात पाहायला मिळाले परंतु सात रस्ता या ठिकाणी स्वागताचे भले मोठे बॅनर लावणाऱ्या भाजप कार्यकर्ते पैलवान प्रकाश घोडके याचा पोलिसांसोबत चांगलाच वाद झाला.
नो डिजिटल झोन मध्ये आणि विनापरवाना बॅनर लागल्याने महापालिकेने ते बॅनर हटवताना घोडके यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
या प्रकरणाच्या बातम्या सर्वच माध्यमांमध्ये लागल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी घोडके याला सोडले. त्यानंतर लगेच प्रकाश घोडके यांनी दुसरा तसाच मला मोठा स्वागताचा बॅनर आणून लावला.