सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतले ताब्यात ; नूतन पालकमंत्र्यांचे….
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर हटवताना पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. कोणतीही परवानगी न घेता आणि नो डिजिटल झोनमध्ये स्वागताचे बॅनर लावल्याने पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने ते बॅनर हटवले. यावेळी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
भाजपचे युवा नेते पैलवान प्रकाश घोडके यांनी नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आज सोलापूर दौरा असल्याने सात रस्ता या ठिकाणी भले मोठे स्वागताचे बॅनर लावले होते परंतु त्या बॅनरची परवानगी नसल्याने आणि सात रस्ता हा परिसर नो डिजिटल झोन असल्याने पोलिसांनी कारवाई केली यावेळी घोडके यांनी या कारवाईला विरोध करताना पोलिस आणि घोडके यांच्यात वाद झाला. घोडके यांनी पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप केल्याने पोलिसांनी शेवटी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन सदर बाजार पोलिस ठाण्याकडे रवाना झाले.