आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर भाजयुमोचा जल्लोष…
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर सर्व भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी या सुवर्ण क्षणाचे जल्लोष लाडू भरवून नाचत साजरा केला.
या प्रसंगी भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, SC मोर्चा प्रदेश सचिव राजा माने, संतोष कदम, अंबादास करगुळे, OBC मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी यतीराज होनमाने, युवा मोर्चाचे विश्वनाथ प्याटी, सिद्राम खजुरर्गी, सुनील पाताले, राजशेखर येमुल, गुरू कावडे, ओंकार होमकर, बाबुराव क्षीरसागर, शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या हातातील पोस्टर आकर्षित करत होते. काय होते पोस्टर मध्ये….
मी पुन्हा आलो, महाराष्ट्राच्या सेवेसाठी, प्रामाणिक नेतृत्वाच्या पाठीशी अवघा महाराष्ट्र एक झाला देव देश व धर्मासाठी तो पुन्हा आला तो पुन्हा आला. असे पोस्टर कार्यकर्त्यांच्या हातात दिसत होते.