धक्कादायक ! सोलापुरात जलजीवनच्या ठेकेदाराने केला आत्महत्येचा प्रयत्न ; कोट्यावधी बिले थकली
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम करणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षाने बिले न मिळाल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मोतीलाल राठोड असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या कॉन्ट्रॅक्टर चे नाव असून ते सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोट्यावधीची बिले थकल्याने त्यांनी विष पिल्याची चर्चा जलजीवन च्या कॉन्ट्रॅक्टर मधून ऐकण्यास मिळाली.
गुरुवारी ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने सुमारे 51 कोटी रुपयांची बिले थकली असल्याने उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, सचिव राहुल पाटील, कार्याध्यक्ष आनंद तोडकरी, हेमंत जाधव, किशोर कुलकर्णी, अण्णाराव पाटील, विवेक राठोड, श्रीकांत सोनी यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जल जीवन योजनेचे बिल वेळेवर निघत नाही, जल जीवन मशीन योजनेअंतर्गत सुरु असलेले कामे बिल निघत नसल्यामुळे बंद झालेले आहेत,
आम्हाला आमचे बील मिळत नाही ही गोष्ट संबंधित विभागाला माहीत असून सुद्धा जल जीवन मिशन ची कामे चालू करा म्हणून आम्हाला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दबाव येत आहे, मुदत वाढीच्या विषयामध्ये विनाकारण आम्हाला दंड लावण्यात येत आहे, आमच्या संघटनेचे अध्यक्ष मोतीलाल राठोड हे बिल निघत नसल्याकारणाने हायपर टेन्शन घेऊ सुसाईड अटेंड केलेला आहे. सध्या ते रूग्णालयात अॅडमीट आहेत.
या अडचणी आणि समस्या निवेदनाद्वारे प्रशासनाच्या नजरेस आणून देण्यात आल्या आहेत.