सोलापूरचे आनंद चंदनशिवे लाडक्या मामांच्या सत्काराला पुण्यात
पुणे: 200 इंदापूर विधानसभा मतदार संघात आमदार दत्तात्रय मामा भरणे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा आमदार या पदावर विक्रमी मताने विजय झाल्याबद्दल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे येथे अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते शाल व बुके देऊन हा सत्कार झाला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी केंगरे, प्रताप आबा पाटील, माजी नगरसेवक गणेश पुजारी, चंद्रकांत सोनवणे, अजय इंगळे, भीमा मस्के व कार्यकर्ते उपस्थित होते.
भरणे मामा यांनी दोन वर्ष सोलापूरचे पालकमंत्री पद सांभाळले. त्यावेळी आनंद चंदनशिवे हे त्यांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जात होते. भरणे यांनी मोठा विकास निधी चंदनशिवे यांना दिला होता.