सोलापुरात किसन भाऊंच्या मेजवानीस युवा वर्गाची झुंबड ; युवा आमदार देवेंद्र कोठे यांचे मार्केट
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांच्या स्नेहभोजनाला युवा वर्गाची अक्षरशः झुंबड उडाली. नुकतीच शहर मध्ये विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सहकुटुंब उपस्थिती लावून कार्यक्रमाचे मार्केट मारले.
सालाबादप्रमाणे याही वर्षी, ईच्छा भगवंताची परीवार यांच्या वतीने पठाण शहावली बाबा दर्गा उरुस निमित्त देवकार्य व ईच्छा भगवंताची संस्थेचे मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त, स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
इच्छा भगवंताची संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मामा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, गुरुशांत धुत्तरगावकर, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, माजी नगरसेवक किसन जाधव, राष्ट्रवादी युवा नेते चेतन गायकवाड यांच्या उपस्थितीत अनिल जाधव यांच्या वाढदिवसाचा केक कापून क्रेनने हार घालून भव्य सत्कार करण्यात आला.
किसन जाधव यांच्या भागातून मोठे मताधिक्य मिळाल्याने आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या पत्नी मोनिका आणि सासू यन्नम यांच्यासह उपस्थिती लावली. माजी आमदार दिलीप माने हे आवर्जून उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे युवा प्रदेश नेते मनीष देशमुख यांनीही उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार, आनंद मुस्तारे, मीडिया सेलचे वैभव गंगणे यांनी उपस्थित राहून अनिल जाधव यांना शुभेच्छा दिल्या.