किसनभाऊ, नागेशअण्णा प्रचाराच्या मैदानात ; मोनिका वहिनींचा प्रचारात झंझावात
सोलापूर : शहर मध्य विधानसभा निवडणुकीतील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंजावात पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील रामवाडी, सेटलमेंट, पटवर्धन चाळ, लिमयेवाडी परिसरात देवेंद्र कोठे यांच्या प्रचारासाठी होम टू होम प्रचार अभियान राबविण्यात आले.
माजी नगरसेवक किसन जाधव, नागेश गायकवाड, चंद्रकांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान झाले. या भागातील नागरिकांसह किसन जाधव यांनी देवेंद्र कोठे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला.
यावेळी आकाश पडवळकर, सूर्यकांत गायकवाड, चेतन गायकवाड, नागेश गायकवाड, शिरीष गायकवाड, रुक्मिणी जाधव, शोभा गायकवाड, सुनीता बिराजदार, भरता आसवदे, दीपक गायकवाड, श्रीनिवास गायकवाड, सुरेश भंडारे, विनीत गायकवाड, रोहन जाधव, कुमार कांती, नवनाथ साळुंखे, बाबुराव संगेपांग, अजित मित्रगोत्री, सत्यम जाधव, जयश्री गायकवाड, सरोजिनी गायकवाड, मीना गायकवाड आदी उपस्थित होते.