मंदिरातले देव सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपासोबत रहा ; धनश्री कोंड्याल यांचे दत्त भक्तांना हाक
सोलापूर : सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मंदिरातील देव सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे शहर मध्य मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन धनश्री कोंड्याल यांनी केले.
शहर मध्य विधानसभा निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारादरम्यान भाजपा आणि महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी दत्त नगर येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्त भक्तांच्या भेटी घेत संवाद साधला. यावेळी भाविकांनी देवेंद्र कोठे यांच्या विजयाचा निर्धार करीत एकमुखी पाठिंबा दिला.
यावेळी धनश्री कोंड्याल म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीला विकासाची दूरदृष्टी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्रात आणि देशभरात उत्कृष्ट विकासकार्याची परंपरा सुरू ठेवली आहे. हीच परंपरा शहर मध्य मतदारसंघात सुरू करण्यासाठी लाडक्या बहिणींसह मतदारांनी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून द्यावे, असे आवाहनही धनश्री कोंड्याल यांनी याप्रसंगी केले.
गुरुवारी सकाळी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून होम टू होम प्रचार करण्यात आला. यावेळी घरोघरी महायुतीच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती असलेले माहितीपत्रक मतदारांना देण्यात आले. याप्रसंगी मतदार बंधू-भगिनींनी देवेंद्र कोठे यांच्या कामाचे कौतुक केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम पर्याय म्हणून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे निश्चित विजयी होतील. नागरिकांची त्यांना भरभरून मते मिळतील, असा विश्वास यावेळी मतदारांनी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू, माजी नगरसेविका राधिका पोसा, राम गड्डम, सदानंद दिकोंडा, भाजपाचे शहर चिटणीस नागेश सरगम, चिटणीस सावित्रा पल्लाटी, आदी उपस्थित होते.