“इस ‘बाबा’ की तो बात ही अलग है” ! प्रचाराच्या धामधुमीत सुद्धा कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव ; पहा व्हिडिओ
सोलापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत मानले जाणारे माजी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री यांच्यावर अशी वेळ आली की, त्यांना पक्ष सोडावा लागला. त्यांनी या विधानसभा निवडणुकीत प्रहारची बॅट हाती घेतली आहे. आता ते विरोधकांच्या बॉलिंग वर चौके छक्के मारण्यास सज्ज झाले आहेत.
बाबांना अपेक्षित नसताना 2019 च्या वेळी काँग्रेसने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. अचानक उमेदवारी दिली असतानाही त्यांनी त्या वेळचे राज्याचे मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांना चांगलीच लढत दिली. त्यांनी तब्बल 58 हजार मते घेतली. आता काडादी यांच्यासाठी जे पुढे पुढे करत आहेत ते काँग्रेसचे नेते बिळात लपून बसले होते.
2019 च्या जोरावरच 2024 मध्ये बाबा मिस्त्री यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली परंतु पक्षाने त्यांच्यासाठी मध्य हा मतदारसंघ सुचवला. पण आपले काम ज्या ठिकाणी आहे त्याच मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी ते ठाम राहिले. पक्षाने दिलीप माने यांच्यासाठी उमेदवारी जाहीर केली परंतु ऐनवेळी माने यांच्यावरही एबी फॉर्म न मिळाल्याचे नामुष्की ओढवली.
शेवटी बाबा मिस्त्री यांनी राज्यातील अपंगांचे नेते बच्चू कडू यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पक्षात प्रवेश केला आणि दक्षिणची उमेदवारी खेचून आणली.
शेवटच्या क्षणी मिळालेली उमेदवारी त्यातच प्रहारचे ठरावीक कार्यकर्ते त्यामुळे बाबा मिस्त्री यांची प्रचारासाठी धामधूम सुरू आहे.
अशातही ते आपली कर्तव्य आणि जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळताना दिसत आहेत. बाबा मिस्त्री यांची ओळख ही सोलापूरच्या गोरगरिबांची आरोग्यदायिनी समजल्या जाणाऱ्या सिव्हील हॉस्पिटल मुळे आहे. त्या सिव्हिल मध्ये कोणत्याही समाजाचा रुग्ण आला तर आता सांगायचे कुणाला? मदत मागायची कुणाला? हे प्रश्न प्रत्येकाच्या तोंडून येतात तेव्हा बाबा मिस्त्री यांचेच नाव येते.
बुधवारी रात्रीच्या सुमारास कार्यकर्त्यांच्या सोबत प्रचाराचे नियोजन करत असतानाच बाबा मिस्त्री यांना उस्मानाबाद मधून फोन आला, तो फोन सिव्हील संदर्भात होता, तसेच आणखी एका रुग्णाची परिस्थिती बिकट असल्याचे फोन त्यांना आले. त्यांनी तातडीने संबंधित डॉक्टरला फोन लावून विचारपूस करत लक्ष देण्याची विनंती केली ते व्हिडिओ पहा…