सोलापुरात ‘पैलवान’चा टाईम चुकला ! मध्य व दक्षिणमधून उमेदवारी ! वेळ आल्यावर विचार करेन
सोलापूर : सोलापुरातील मुस्लिम नेते तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंडखोरी करत शहर मध्ये विधानसभा आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. अनेकांना अपेक्षा होती ते दक्षिणमधून माघार घेतील परंतु त्यांना यायला वेळ झाला आणि त्यांचा टाइमिंग चुकला.
ते सुरुवातीला मध्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गेले मात्र त्या ठिकाणी दोन मिनिटे उशीर झाला. तिथेही माघार घेत आली नाही. त्यामुळे दक्षिण मध्येही अर्ज तसाच राहिला आणि मध्येही राहिला.
माध्यमांशी बोलताना माहिती दिली, मी सोलापुरात नव्हतो, बाहेरगावी होतो, समाज बांधवांशी चर्चा करून यायला मला उशीर झाला परंतु मध्य मध्ये ताकतीने लढणार असे सांगताना वेळ आली तर विचार करेन अशी गुगली ही त्यांनी टाकली.
शहर मध्य मधील तौफिक शेख यांच्या उमेदवारीने एमआयएम उमेदवार फारूक शाब्दि यांची अडचण होण्याची शक्यता दिसत आहे. परंतु मुस्लिम समाजातून भारतीय जनता पार्टीला कडाडून विरोध आहे. त्यामुळे समाजाची मानसिकता पाहता तौफिक शेख यांच्यावर समाजाचा दबाव येण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. म्हणूनच येणाऱ्या पंधरा दिवसात कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडेही सर्वांचे लक्ष आहे.