ब्रेकींग : दक्षिण मध्ये ठरले ! अपक्षांमधून एकच उमेदवार द्यायचा ; परिवर्तनने उमेदवार ठेवला गुलदस्त्यात
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व अपक्ष उमेदवारांनी एकत्रित येऊन बैठक घेतली. दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे निमंत्रक युवराज राठोड यांच्या प्रयत्नांना यश आले असून सर्वानुमते एकच उमेदवार ठरला आहे.
या बैठकीला अपक्ष उमेदवार तौफिक शेख, अण्णाप्पा सत्तूबर, श्रीशैल हत्तुरे, बसवराज बगले, दादाराव कोरे, उमेश गायकवाड, सचिन सोनटक्के, शेखर बंगाळे, मीनाक्षी टेळे, सिद्राम चोपडे, बाळूमामा बंडगर यांची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार हे ओबीसी आणि बहुजन घटकातून येतात. आज दक्षिण सोलापूर मध्ये सुमारे ७० टक्के ओबीसी, बहुजन समाज आहे. याच ओबीसी आणि बहुजन समाजासाठी कायम प्रयत्नशील राहणारा व त्यांच्या हक्काची न्यायाची दखल घेणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याचा सूर पुढे आला.
असे ठरवण्यात आले की, दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीचा एकच असा उमेदवार ठेवण्याचे ठरले. त्याच्या पाठीशी सर्व पक्ष उमेदवार उभारणार आहेत. जे माघार घेणार आहेत. त्यांनी युवराज राठोड यांच्याकडे आपले माघार अर्ज द्यायचे ते सर्व अर्ज सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एकत्रित जाऊन जमा करण्यात येणार आहेत. आता तो एकमेव उमेदवार कोण हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.