फडणवीसांनी सोलापूरच्या देवेंद्रला दिलेला शब्द पाळला ! कोठे सोलापुरात इतिहास घडवणार
सोलापूर : मागील अनेक दिवसांपासून सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ नक्की शिवसेना की भाजप कोणाला जाणार अशी चर्चा ऐकण्यास मिळत होती. यामध्ये हा मतदारसंघ भाजपला जाणार हेच निश्चित झाले होते त्याप्रमाणे शनिवारी भाजपची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आणि शहर मध्य या मतदारसंघात देवेंद्र कोठे यांना उमेदवारी मिळाली.
लोकसभा निवडणुकी दरम्यान देवेंद्र कोठे यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नागपूर येथे जाऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्याच वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र कोठे यांचे पालकत्व स्वीकारले होते. तू काम करत जा, मी तुला निश्चित चांगली संधी देईन असेही फडणवीसांनी कोठे यांना सांगितले होते.
त्या दिलेल्या शब्दाप्रमाणे फडणवीस यांनी देवेंद्र कोठे यांना मध्य ची उमेदवारी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ देवेंद्र यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात मताधिक्य मिळवण्यापासून रोखले. हेच यश देवेंद्र फोटे यांच्या कामाचे होते. आणि ते राम सातपुते जाणून होते.
लोकसभा निवडणूक हिंदुत्वावर गाजली आणि देवेंद्र कोठे यांनी वल्याळ मैदानावर झालेल्या सभेत लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या भाषणाची संपूर्ण लोकसभा मतदारसंघात चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीनंतर दरम्यानच्या चार महिन्यांमध्ये देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य या मतदारसंघात महा सेवा शिबिर राबवून सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न सोडवले. यातूनच त्यांची चांगल्या प्रकारे मोर्चे बांधणी झाल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र कोठे हा चेहरा या मतदारसंघात आणखी मजबूत झाला.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. माध्यमांशी प्रतिक्रिया देताना पक्षाने आपले काम केले आहे. मी या संधीचे सोने करणार अशी प्रतिक्रिया दिली.