शरद पवारांच्या आग्रहाखातर मी निवडणुकीच्या रिंगणात आलो, काडादी यांनी निर्णय सोपवला या नेत्यांवर
सोलापूर : द्वेषाचे राजकारण थांबवण्यासाठी आपण हे पाऊल उचलले असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या आग्रहाखातर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो पण आता शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे जे निर्णय घेतील ते मला मान्य राहील अशी प्रामाणिक भूमिका धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली.
दक्षिण सोलापूर विधानसभेची महाविकास आघाडीतून जागा शिवसेनेला सुटल्यानंतर शांत राहिलेले धर्मराज काडादी यांनी शुक्रवारी जेव्हा जागा काँग्रेसला मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर समर्थकांनी काडादी यांना निर्णय घेण्याची भूमिका व्यक्त केली त्यासाठी गंगा या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर काडादी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, काँग्रेस पक्षावर दबाव आणण्यासाठी ही भूमिका नाही, ही बैठक बोलावण्यामागचा तो उद्देश नव्हता. आजपर्यंत झालेल्या घटनांचा खुलासा करण्यासाठी ही बैठक घेतली. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. मुळात मी इच्छुक नव्हतो, अप्पांनी स्थापन केलेल्या संस्था आहेत त्या मोठ्या झाल्या आहेत, त्याबाबत निर्णय घ्यायचा होता.
पण गेल्या काळात संस्था चालवताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले.
पण हे काम करताना वैयक्तिक त्रास झाला, द्वेषाचे राजकारण माझ्यासोबत झाले अशा अनेक घटना आहेत त्या मी सहन केल्या.
चिमणी पडल्याची घटना मनाला लागून गेली. म्हणून त्याबद्दलचा राग व्यक्त झाला पाहिजे म्हणून लोकसभेत आम्ही बाहेर पडलो. प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यात यशस्वी झालो. मी आमदारीच्या रेसमध्ये आलो नाही. परंतु निवडणुका जवळ आल्या पवारांकडून निरोप आला त्यांना भेटलो त्यांच्यासमोर निवडणूक लढवण्याची भूमिका मांडली.
त्यांनी होकार दिला नंतर त्यांच्यावर मी निर्णय सोपवला. त्यांनी मनावर घेतले, दक्षिण मधून उभारला पाहिजे, सांगितल्यावर मी राष्ट्रवादीचा फॉर्म भरला. नंतर निर्णय शरद पवार सुशीलकुमार शिंदे यांच्या वर सोपवला. विजयसिंह मोहिते पाटील यांनी ही उभारण्यास सांगितले.
द्वेषाचे राजकारण थांबले पाहिजे म्हणून हे पाऊल उचलले. आमच्या घरात काँग्रेसची परंपरा आहे. मी आजपर्यंत शिंदे परिवाराला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मर्यादा होत्या.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून
तिकीट मिळाले तर ठीक नाही मिळाले तर ठीक. जनतेचे प्रेम, नेत्यांच्या मनात घर हेच माझे सर्वस्व आहे, पवार -शिंदे जे निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले.