सोलापूर ; सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील रविवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत ते रविवारी मुक्काम करणार असून सोमवारी सकाळी सोलापूरची आई श्री रूपाभवानी मातेच्या दर्शनाने आपल्या प्रशासकीय कामकाजाला ते सुरुवात करणार आहे. त्यांच्या या दौऱ्यात भरगच्च अशा बैठका असून जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद, महापालिका, उजनी प्रकल्प आढावा, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, टंचाई आढावा ते घेणार आहेत. रविवारी सायंकाळी सहा वाजता सोलापुरात आल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी नागरिकांना भेटीसाठी वेळ दिली आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा कसा आहे पहा…