गौरी – गणपती उत्सवात ऋतुजा दत्तात्रय बिडकर हिच्याकडून cyber security awareness
सोलापूर शहरात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतोय. गणेशोत्सवा पाठोपाठ गौरींचे आगमन होऊन त्यांचे विसर्जन ही झाले. दरम्यान गौरी- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ मध्ये MCA – II शिक्षण घेत असलेली ऋतुजा दत्तात्रय बिडकर हिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ व Quick Heal foundation च्या संयुक्त विद्यमाने सोशल मीडियावर हॅकर्सच्यामुळे वाढलेले गुन्हे संपुष्टात आणण्यासाठी व लोकांमध्ये याबाबत सुरक्षिततेचे जन प्रबोधन करण्यासाठी cyber security awareness हा उपक्रम गौराई समोर सादर केला.
लोकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधानता बाळगावी हॅकर्सच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नये सोशल मीडियावर कुठलेही आर्थिक व्यवहाराची देवाण- घेवाण करू नये विशेषतः महिला /युवक/ युवतीनी दक्षता घ्यावी असा संदेश प्रस्थापित केला. या उपक्रमाला सोलापूरकरांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाचं शहर पोलिसांनी ही विशेष असं कौतुक केले. ऋतुजा बिडकर हिच्या या उपक्रमासाठी तिच्या आई-वडिलांनी ही तिला सर्वतोपरी मदत केली. आणि हा उपक्रम यशस्वी केला.