सोलापुरात ‘पोलीस काका व पोलीस दिदी’ काय आहे हा अभिनव उपक्रम
सोलापूर : पोलीस आयुक्तालयानं हाती घेतलेला ‘पोलीस काका व पोलीस दिदी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याकरीता शनिवारी, ३१ ऑगस्ट रोजी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उपस्थितांना Good Touch/Bad Touch बाबतचे व्हिडीओही दाखविण्यात आले. या उपक्रमांकरीता नेमण्यात आलेले ०८ पोलीस अधिकारी व २३ अंमलदारांची या बैठकीस उपस्थित होती.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत, त्यांनी शाळेतील मुलांमध्ये पोलीसांबाबत विश्वास निर्माण करुन पोलीस हे आपल्या सुरक्षिततेसाठी असतात, हे जाणीव करुन देण्यास उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले.
या उपक्रमांतर्गत शाळेत भेटीदरम्यान शाळेतील सर्व शिपाई तसेच शाळेतील सीसीटीव्ही. कॅमेरा, शाळेचे सुरक्षिततेबाबतचे काय उपाय योजना आहेत, याबाबतची माहिती घेण्यासही सूचित केलं.
शिक्षक व शाळेतील इतर कर्मचारी, शिपाई यांची माहिती व आधारकार्डची माहिती ठेवण्याबरोबरच शाळेतील मुलांच्या सुरक्षेकरीता गार्ड नेमण्याकरीता शाळांना सूचना देण्यास सांगितले.
सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी उपस्थितांना हा उपक्रम यशस्वी करण्याकरीता प्रोत्साहीत केलं. शाळेतील शिपाई वर्ग हे चांगल्या वर्तणुकीचे नेमण्यास शाळेला सुचना देण्यात याव्यात, तसेच शाळेतील मुलांच्या पालकांमध्ये देखील या उपक्रमासंबंधी जनजागृती करायला सांगितले.
सदर मिटींगकरीता उपस्थित असलेल्या अधिकारी व अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक संजीवनी व्हट्टे यांनी पोलीस काका व पोलीस दिदी या उपक्रमाचं प्रशिक्षण दिलं. या मिटींगचं सुत्रसंचालन पोलीस सब इन्स्पेक्टर करुणा चौगुले यांनी केले, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे यांनी आभार व्यक्त केलं.