एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस खुर्ची सोडा ; काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका गुप्ता यांनी सोलापुरात केले लक्ष्य
बदलापूर घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन खुर्ची सोडावी अशी मागणी उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका गुप्ता यांनी सोलापुरात केली.
एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत, सरकार तुमचे आहे, गृह विभाग तुमच्याकडे आहे, बदलापूर घटनेत आंदोलन करणाऱ्या 300 जणांवर गुन्हे दाखल झाले, 70 आंदोलकांना अटक झाली, पोलिसांच्या प्रक्रियेवर संशय निर्माण होतो, या घटनेला शाळा प्रशासन जिम्मेदार नाही का शाळा व्यवस्थापनाला वाचविण्याचा प्रयत्न केला जात असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश आले असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
महिलांवर अत्याचार वाढले, बेटी बचाव अभियान कुठे आहे, त्याच निधी निवडणुकांवर खर्च केला जातो असा आरोप करत शनिवार 24 तारखेला महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे, या घटनेत पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
कोलकाता घटना, काँग्रेसने निषेध केला, कोलकाता च्या गृहमंत्र्यांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले पाहिजे, सीबीआय चौकशी सुरू आहे, जनता विरोधात उभारली आहे, त्याचे काँग्रेस पार्टी समर्थन करीत नाही, जर न्याय देता येत नसेल तर मग त्या ममता बॅनर्जी असतील किंवा एकनाथ शिंदे यांनी खुर्ची सोडावी.