सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांची यात्रा हि गड्डा म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या यात्रेत बाराबंदी या पोशाखाला महत्व आहे. सात ही नंदीध्वजासह भाविक बाराबंदी हा पोशाख परिधान करून यात्रेत सहभागी होतात.
सोलापूरला येणारे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यापैकी काही अधिकारी यापूर्वी बाराबंदी परिधान केलेले पहायला मिळाले. बाराबंदी घालण्याचा मोह यंदा राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही आवरला नाही. त्यांनी हा पोशाख घालूनच यात्रेला उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत अक्कलकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही बाराबंदी घातला होता.
पालकमंत्री विखे पाटील यांनी बाराबंदी घातला म्हटल्यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनाही बारामती घालण्याचा मोह आवरला नाही ते सुद्धा बाराबंदीच्या वेशभूषेत या अक्षता सोहळ्याला हजेरी लावली. जिल्हाधिकारी बाराबंदीत आल्याचे पाहताच माध्यमांचे कॅमेरे आपोआप त्यांच्याकडे वळाले सर्वांनी त्यांचे फोटो काढले.
यात्रा पाहण्यासाठी बारामती वरून विशेष आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते मात्र त्यांनी बाराबंदी ड्रेस परिधान करून हजेरी लावल्याने ते सुद्धा चर्चेचा विषय झाले देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी राजेंद्र पवार यांचे विशेष अधिरातिथ्य केल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे दुसरे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त विजय पाटील यांनीही बाराबंदी पोशाख परिधान केला होता.