सोलापूर : वळसंग येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्घाटन केलेल्या केलेल्या ऐतिहासिक विहीर स्मारक उभारणे वाचनालय, विहीर परिसराला विद्युत रोषणाई, पेवर ब्लॉक, विपश्यना केंद्र सुशोभीकरण व विविध विकास कामांकरिता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन निळी टोपी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्याचबरोबर सोलापूर शहरातील विविध मागण्या व अडचणी संदर्भात पालकमंत्री यांना निवेदन दिले.
या सत्कार समारंभ प्रसंगी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, मंगळवेढा पंढरपूर विभागाचे आमदार समाधान आवताडे, सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख, माजी नगरसेवक गणेश पुजारी, शहाजी पवार, प्राध्यापक आशोक निम्बर्गी, चन्नवीर चिट्टे, हृदयनाथ मोकाशी, अविनाश भडकुंबे, सुरज पाटील, भीमा मस्के उपस्थित होते. आनंद चंदनशिवे यांनी केलेल्या सत्काराने भारावून गेल्याचे पहायला मिळाले.
आनंद चंदनशिवे अध्याप ही कोणत्या पक्षात नसल्याने या सत्काराची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. अक्षता सोहळ्यासाठी संमती कट्ट्यावर पालकमंत्र्याच्या सोबतच आनंद चंदनशिवे हे आल्याचे पाहायला मिळाले.