सोलापूरकरांनों लक्ष द्या ! लोकसभा निवडणुकीत नाव Delete होते का? मग लगेच दुरुस्त करा ! ही आहे तारीख
प्रारुप मतदार यादी दि.०६.०८.202४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली असून या निमिताने पत्रकार परिषदेमध्ये कुमार आशीर्वाद, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी नव मतदारांनी नाव नोंदणी करुन आपला मताधिकार बजावावा असे आवाहन केले.
दि.०६ ऑगस्ट, 202४ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारुप यादी प्रकाशित करुन यंदाच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रम दि.०६ ऑगस्ट, 202४ ते २० ऑगस्ट, 202४ या कालावधीत राबविला जाणार आहे. दि.01 जुलै, 2024 रोजी किंवा त्याआधी 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकाना या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार आहे. 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकामध्ये मताधिकार बजाविणेसाठी ही मतत्वाची संधी असलेने पात्र नव मतदारांनी नाव नोंदणी करावी, तसेच ज्या मतदरांची नावे वगळली गेलेली आहेत / अथवा ज्यांची नावे मतदार यादी मध्ये नाहीतच अश्या सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्र ६ भरून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत असे कुमार आशीर्वाद, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी म्हटले.
प्रारुप यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. कारण, बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नांव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच आपले नांव, पत्ता, लिंग, जन्म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशिल सुध्दा अचूक आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलामध्ये दुरुस्त्या करावयाच्या असतील त्यांनी अर्ज क्रमांक 8 भरावा. विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमातंर्गत एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्त्यावर राहात नसेल, तर अशा नावा बद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करुन संबधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्वाची असते.
नव मतदार नोंदणी, दुरुस्ती व वगळणी यासाठी दि. १० व ११ ऑगस्ट, 202४ व दि.१७ व १८ ऑगस्ट, 202४ या दिवशी विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम राबविला जाणार असून या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर BLO मतदार यादीसह उपस्थित राहतील.
तरी नागरिकांनी आपली नावे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम दि.०६ ऑगस्ट, 202४ ते २० ऑगस्ट, 2028 या कालावधीत नोंदवून घेण्यात यावीत तसेच तद्नंतर सदर मतदार नोंदणी प्रक्रिया ही निरंतर सुरु राहणार आहे. असे आवाहन कुमार आशीर्वाद, जिल्हा निवडणूक अधिकारी, तथा जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी केले.
Online मतदार नोंदणीसाठी मतदारांनी voters.eci.gov.in आपली नावे मतदार यादीमध्ये शोधणेसाठी ceo.maharashtra.gov.in संकेतस्थळाचा वापर करावा. मतदार यादीसंदर्भात काही माहिती आवश्यक असलेस अथवा काही दुरुस्ती असलेस संबधित सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.