क्या बात है ! एका पाठोपाठ इतके सामाजिक कार्यक्रम ; सोमनाथ वैद्य यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा
195 पत्रकार पाल्य शिषवृत्ती
गुरुपौर्णिमा 51 हजार बेसन लाडू वाटप
6500 छत्री वाटप
5000 टी शर्ट वाटप
5000 बचत गट महिला पर्स वाटप
यंदाच्या बसव ब्रिगेड 2024 च्या पुरस्कार सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष लिंगायत समाजाचे प्रशासकीय व सामाजिक कामाची बांधिलकी कायम जोपसणारे व्यक्तिमत्व सोमेश वैद्य हे उच्चशिक्षित असून त्यानी 2009 साली केसी विधी महाविद्यालय मुंबई विद्यापीठमधून कायदाचे शिक्षण पूर्ण केले. सोमेश यांचा दयानंद महाविद्यालय सोलापूर ते मुंबई येथील केसी विधी महाविद्यालय चर्चगेट शिक्षणप्रवास सर्वसामान्यसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
कायद्याचे शिक्षण पूर्ण करीत असताना सोमेश ह्यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष यांचे स्वीय सहायक म्हूणन सन 2006 ते 2009 दरम्यान काम पहिले,
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री यांचे मंत्रालयीन आस्थापनेवर स्वीय सहायक म्हूणन सोमेश यांनी 5 वर्ष काम केले आहे. या काळात त्यांनी सोलापूर जिल्हातील अनेक समाजउपयोगी कामे केली असून कोरोना लॉकडाउन काळात त्यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावातील 10 एकर पेरू शेतीच्या माध्यमातून स्थानिक गरजू लोकांना नियमित रोजगार उपलब्ध करून 200 टन पेरू उत्पादन वार्षिक घेऊन राज्यात आधुनिक शेती चा प्रयोग उशस्वी केला आहे.सदरची सोमेश वैद्य यांची शेतजमीन केंद्रसरकारने रेल्वे प्रकल्पसाठी भुसंपादीत केली असून त्यावर मार्डी गावचे रेल्वे स्टेशन निर्माण होणार आहे.
सोमेश वैद्य यांच्या कृषी आणि ग्रामविकास कार्याची दखल घेऊन त्यांना सन 2023 चा सकाळ सन्मान राज्याच्या मुख्यमंत्री हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे.
राजभवनातील सोहळ्यात तत्कालीन राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांनी सोमेश यांना सन्मानित केले असून राज्याचे कृषीमंत्री ते तालुका कृषी विभाग यांनी सोमेश यांच्या कृषी कामाची लेखी प्रशस्तीपत्र देऊन प्रशंसा केली आहे.
विधानसभा अध्यक्ष ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सोमेश यांच्या कृषी आणि ग्रामविकास कार्याची प्रशंसा केली आहे
गेल्या 10 वर्षात स्वतःच्या जन्मगावी शासननिधीच्या माध्यमातून त्यांनी गावाचा विकास घडवून आणला याची दखल गावकरी यांनी घेऊन सोमेश यांच्या वडिलांना गावातील लोकांनी बिनविरोध सरपंच केले आहे.
सोमेश वैद्य हे गेल्या 19 वर्षांपासून मंत्रालय विधानभवनात स्वीय सहायक म्हूणन काम करीत असून त्यांना प्रशासकीय कामाचा प्रचंड मोठा अनुभव आहे. सरकारी कामे कशी उत्तमपणे व जलद करून घ्यायची याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे.
सोमेश यांनी देशानांतर्गत सह परदेश अभ्यास दौरे केले असून दावोस, लंडन, पॅरिस, रोम इटली, दुबई, चीन तसेच अन्य युरोपिय देशाचा दौरा 3 वेळा करून त्यांनी नवीननवीन गोष्टी कौशल्य अवगत केल्या आहेत.
गेल्या 19 वर्षांपासून मंत्रालय विधानभवन प्रशासकीय पातळीवर सतत लोकांचा संपर्क ठेऊन सोमेश वैद्य यांनी अनेक गरजूना सढळ हाताने स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फौंडेशन च्या माध्यमातून मदत केली आहे अशा या तरुण व्यक्तिमत्वचा बसव ब्रिगेड मार्फत स्वागतअध्यक्ष म्हूणन सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे.