निराधारांना मदतीचा आधार देत अजित पवारांचा वाढदिवस साजरा ; उज्वला पाटील यांचा उपक्रम
उत्तर सोलापूर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा यंदा वाढदिवस अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात वाढदिवसानिमित्त सप्ताह राबविण्यात आला. त्याचनिमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष उज्वला पाटील यांनी विविध उपक्रम आयोजित केले होते.
भोगाव येथील आधार वृद्धा आश्नमात व मार्डीच्या यमाई आश्नम शाळेत धान्यवाटप करण्यात आले.
ग्रामीण भागात बचत गटातील महिलांना साडी वाटप तर या भागातील गोडावून कामगारांना पावसाळ्या निमित्ताने छत्री वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महिला जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे, जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे, जिल्हा जनरल सेक्रेटरी प्रा.राज साळुंखे, महिला प्रदेश सरचिटणीस सायरा शेख आदी उपस्थित होते. आश्रम शाळा व आधार वृध्द आश्रम यांच्या कडुन अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत उज्वला पाटील यांचे आभार मानण्यात आले.