अजितदादा चषक कबड्डी स्पर्धेत क्रीडा प्रेमींनी अनुभवला थरार ; कुणी जिंकला कप? इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लबचे उत्कृष्ट आयोजन
सोलापूर:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन लिमयेवाडी येथील उदय विकास प्रशालेच्या समोरील शंकर भवन येथे आयोजित करण्यात आले होते.
या एकदिवसीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अंजुमन क्रीडा मंडळने बाजी मारत विजेता होण्याचा मान मिळवला तर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघ उपविजेता संघ ठरला आहे. या अंतिम सामन्यातील कबड्डीपटूंच्या चुरशीच्या खेळाने क्रीडा रसिकांच्या डोळ्याचे अगदी पारणे फेडले. दोन मॅटच्या क्रीडांगणावर या स्पर्धेच्या लढतीचा धमाका कबड्डी प्रेमींना अनुभवायला मिळाला.
दरम्यान उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांनी केले. या कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक वितरण मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बाजार समितीचे अप्रशासकीय सदस्य अमोल शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे, दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी पक्षाचे डॉ बसवराज बगले, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, हेमंत चौधरी, अंबादास मारुती गायकवाड, अल्ताफ बुराण, अकलूजचे प्रताप ढेरे, करवा शेठजी, टकारी समाज माजी युवक अध्यक्ष सचिन जाधव, सागर कांबळे, पंडित शेटे, शिवा बंडगर, महावितरणचे अधिकारी सुनील गायकवाड, श्रीनिवास गायकवाड, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव, महिला शहर समन्वयक शशिकला कसपटे, महिला शहर उपाध्यक्ष शोभा गायकवाड, सुनीता बिराजदार, प्रमिला स्वामी, सरोजनी जाधव, संगीता गायकवाड, लक्ष्मी आठवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार यशवंत माने यांच्या हस्ते विजेते संघास ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह उपविजेता संघास रोख रुपये ७ हजार आणि स्मृतिचिन्ह, तर उत्कृष्ट पक्कड अनिकेत वाघमारे यांना एक हजार रुपये आणि उत्कृष्ट चढाई स्वयब शेख यांना एक हजार रुपये अशी रक्कम देऊन त्यांना गौरवण्यात आले.
किसन जाधव यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेले स्पर्धा ही उल्लेखनीय असल्याचे आमदार यशवंत माने यावेळेस म्हणाले.
या अजितदादा चषक २०२४ आयोजित एकदिवसीय कबड्डी स्पर्धेत २० संघाने सहभाग नोंदविला. १५ पंचांनी या कबड्डी स्पर्धेचे काम पाहिलं. तर सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव मदनलाल गायकवाड, पंचप्रमुख तथा सहसचिव संतोष जाधव, भक्तराज जाधव, आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
कबड्डी खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते, निर्णय क्षमतेत वाढ होते, धैर्य व परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी वाढते, परस्पर सहकाऱ्यांचे भावना वाढते, अंगी सामर्थ्य आणि चतुराई निर्माण होते आंतरराष्ट्रीय कबड्डी पटू तयारी व्हावेत या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या पुढील काळात राज्यस्तरीय स्पर्धा सोलापुरात घेण्याचा मानस असल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, किरण शिंदे, अमोल जगताप, माऊली जरग, ऋषी येवले, माणिक कांबळे, वसंत कांबळे, सचिन अंगडीकर, आकाश जाधव, सोनू पटेल, हुलगप्पा शासम, दिनेश आवटी, प्रथमेश पवार, उमेश जाधव, फिरोज पठाण, ऋषभ प्याटी,जितेंद्र दारलू, अभिजीत कदम, दशरथ शेंडगे देशमुख, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, आणि इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे सदस्य व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.