सोलापूर : चेतन नरोटे हे काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष झाल्यापासून युवकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नरोटे हे पक्षाला बराच वेळ देत असल्याने पक्षात सुद्धा उत्साह दिसून येतोय. त्यामुळे काँग्रेस पक्षात येणाऱ्यांचा लोंढा वाढत असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील युवा नेता मनोहर चकोलेकर याने हातातील घड्याळ काढून काँग्रेसचा हात हातात घेतला. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जितु वाडकर हे उपस्थित होते.