सोलापूर : काँग्रेसचे माजी महापौर आरिफ शेख यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल यांच्या वाढदिनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी खासदारकीसाठी खरटमल यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर या बातमीचे पडसाद गुरुवारी काँग्रेस भवनात उमटले.
या प्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आरिफ शेख यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरिफ शेख हे काँग्रेसचे माजी महापौर आहेत, ज्येष्ठ व जबाबदार नेते असून त्यांच्या तोंडून असे शब्द येणे योग्य नाही. त्यांनी त्याचा योग्य खुलासा करावा तसेच ‘कुंकू धन्याचं आणि मंगळसूत्र गण्याचं’ असेही वागू नये असा चिमटा त्यांनी यावेळी काढला आहे. पहा काय म्हणाले चेतन नरोटे