सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे माजी महापौर आरिफ शेख ज्येष्ठ नेते शकील मौलवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह खरटमल यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी खरटमल यांना भावी खासदारकीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काँग्रेसमध्ये उडालेल्या गोंधळानंतर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी ही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान आरिफ शेख व शकील मौलवी यांनी याचे स्पष्टीकरण देताना सोलापूर लोकसभेसाठी आमचे नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांना डावलून सुधीर खरटमल यांना उमेदवारी नाही तर सोलापूर लोकसभेची जागा ही आता काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादीला सुटण्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे जर भविष्यात तसेच झाले तर खरटमल यांना आपण खासदारकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत, त्या मागचा अर्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वेगळा काढू नये, आणि आपण कुणाला खुश करण्यासाठी बोलत नाही, त्याची गरजही आम्हाला नाही असे असे स्पष्टीकरण शेख व मौलवी यांनी दिले.