सोलापूर : जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रमांक एकचे पद मागील आठ महिन्यापासून रिक्त होते त्या पदावर उपअभियंता सुनील कटकधोंड यांच्याकडे हा प्रभार होता. या पदावर आता कार्यकारी अभियंतापदी नरेंद्र खराडे हे बुधवारी रुजू झाले आहेत.
तत्कालीन कार्यकारी अभियंता पी डी कदम हे सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. नरेंद्र खराडे हे पालघर जिल्हा परिषदेतून पदोन्नतीने सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले आहेत. खराडे यांना जिल्हा परिषदेचा मोठा अनुभव आहे. 1994 शाखा अभियंता म्हणून पूर्वीच्या ठाणे जिल्हा परिषदेमध्ये ते रुजू झाले त्यानंतर झालेल्या पालघर जिल्हा परिषदेमध्ये त्यांची सेवा झाली आहे. खराडे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील कराड इथले रहिवासी आहेत.