संतोष पवार यांची महायुतीकडून उमेदवारी जोरदार मोर्चेबांधणी ; दक्षिणचा ‘मार्ग ‘ सापडला
मार्ग फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार ह्यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर मध्ये युवकांची मोठी फळी उभी केली आहे. मार्ग फौंडेशन च्या ५० पेक्षा जास्त शाखांची सुरवात त्यांनी विविध गावात व शहरात केली त्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात देखील त्यांची संघटना अग्रेसर राहिली. याचीच दखल घेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षाकडून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यांची तठस्थ राहण्याची भूमिका त्यांच्यासाठी फायदेशीर ठरल्याचे दिसून येथे.
दक्षिण सोलापूर मतदार संघात भाजपच्या विद्यमान आमदार व वजनदार नेते असताना देखील झालेली पीछेहाट हि भाजपच्या जिव्हारी लागणारी आहे त्यामुळे भाजप नवीन पर्यायाच्या शोधात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, याच संधीचा फायदा घेत संतोष पवार यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरु केल्याचे कळते, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व भाजपमधील वजनदार नेते गिरीश महाजन यांच्या समवेत त्यांचे अनेक गुप्त बैठक झाल्याचे कळते.
वरिष्ठांच्या आदेशावरूनच त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून प्रत्येक गावात त्यांची टीम पोहचली आहे. पक्ष विरहित मोठी यंत्रणा त्यांनी उभे केले असून मोठा गाजावाजा न करता मतदारांशी संपर्क करण्याचे काम या टीम मार्फत होत आहे. अनेक पक्षातील युवकांची फळी देखील त्यांच्या संपर्कात असून योग्य वेळी ती त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे येऊन काम करताना दिसेल असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. रणनीतीचाच एक भाग म्हणून बापूंचे अत्यंत निकटवर्तीय म्हणाले जाणारे भाजपा तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी सावकार यांच्या घरी चहा पान करण्याच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या घरात जगद्गुरुंचे आशीर्वाद घेतले.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी देखील अचानक पणे मार्ग फौंडेशन च्या कार्यालयाला भेट दिली व तयारीचा आढावा घेतला. आता हि भेट अचानक झाली का ठरवून केली हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरत आहे. संतोष पवार यांच्या बाबतीत पुढील होणाऱ्या घडामोडींवर सर्व तालुक्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष असून ते कोणता झटका कोणाला देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल .