आषाढी वारीत झेडपी ठेवणार 1 हजार स्नानगृहा सहित 4 हजार शौचालये ; स्वच्छतेचे अप टू डेट नियोजन
सोलापूर – जिल्हा परिषदेच्या
वतीने संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज यांचे सह दहा पालखी मार्गावर 4 हजार तात्पुरती शौचालये उभारणेत येत आहेत. या बरोबरच एक हजार स्नानगृहे देखील उभारणेत येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा
मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.
पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या सिईओ मनिषा आव्हाळे यांनी सुविधांची पाहणी करून करून कामे वेगाने पुर्ण करणेचे सुचना दिल्या. भाविका साठी विविध सुविधा देणेत येत आहेत.
दहा मानाच्या पालख्यांना ६० ठिकाणी ही सुविधा देणेत येत आहे. पालखी मार्गावर स्वच्छतेसाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करणेत येत असून निर्मल वारी अभियान यशस्वीपणे राबविणे साठी वारकरी व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेचे सर्व विभाग या साठी प्रयत्न करीत आहेत. वारकरी बांधवांना पालखी मार्गावर आरोग्य सुविघा बरोबर स्वच्छता व पिण्याचे पाणी व स्नानगृहाची सुविधा देणेत येत आहे.
शौचालया साठी 237 लोक काम करीत आहेत. चार पाळ्यात हे काम सुरू राहणार आहे. स्वच्छतेसाठी ३४ मैला गाळ उपसणारे मशीन असणार आहेत. ३४ जेटींग मशीन असून एक हजार स्नानगृहे असणार आहेत. पालखी मार्गावर 82 चेजींग रूम असणार आहेत. महिलांना कपडे बदलणे साठी चेजींग रूम ची सुविधा करणेत येत आहे.
पालखी मार्गावर ३१२ ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रे असणार आहेत. पालखी मार्ग निर्मल करणे साठी प्रशासनाचे प्रयत्न असणार आहेत. मार्गावर कुठेही प्लास्टिक दिसणार नाही. प्लास्टिकचा वापर कमी करणे साठी भाविकांना आवाहन करणेत येत असून वापरात आलेले प्लास्टिक संकलन केंद्रात टाकणे साठी ३१२ ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रात प्लास्टिक टाकणेची व्सवस्था करणेत आली आहे. मार्गावर जर पाचशे मीटरवर तसेच
पालखी तळावर मुक्कामाचे व विश्रांतीचे
ठिकाणी ही व्यवस्था असणार असल्याचे
सिईओ आव्हाळे यांनी सांगितले.