केंद्र सरकारचे सादर झालेले बजेट सोलापूरच्या दृष्टीने फायद्याचे आहे. टेक्स्टाईल उद्योगावरील जीएसटी कमी केल्यामुळे याचा फायदा सोलापुरातील उद्योजकांना होणार आहे. बजेटमध्ये ज्वारी निर्यातीला संधी दिली आहॆ. सोलापूर जिल्हा ज्वारी पिकात अग्रेसर आहॆ. त्यामुळे याचा फायदाही सोलापूर जिल्ह्याला होणार आहे.
याशिवाय विविध कार्यकारी सोसायटीचे डिजिटललायझेशन करून त्यात पारदर्शकता आणण्यासाठी विशेष निधीची उपलब्धता केली आहे. स्टार्टअप योजनेद्वारे नवीन उद्योजकांसाठी विनातारण दीड कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. याचा फायदाही सोलापूर मधील उद्योजकांना होणार आहे. बचत गटाचे उत्पादन वाढवण्यासाठीही प्रोत्साहन देण्यात आले आहे. प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी मेडिकल क्षेत्रासाठी ही प्रोत्साहन दिले आहे.
जास्तीत जास्त मेडिकल कॉलेज झाल्यास याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. रोजगार निर्मितीसाठी पर्यटन प्रोत्साहन दिले आहे. या महत्त्वाच्या बाबी बजेटमध्ये मांडल्या गेल्या आहेत याचा फायदा सोलापूर शहर आणि जिल्ह्याला निश्चित होणार आहे त्यामुळे हे बजेट सोलापूरच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे आहे. अशी प्रतिक्रिया माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.



















