सोलापूर : विश्वकृपा विद्या प्रतिष्ठान बाळे या शैक्षणिक संस्थेच्या मार्गदर्शिका कैं.मीनाताई दिगंबर ढेपे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या उज्जवला सुशिलरत्न पुरस्काराची घोषणा संयोजक मुख्याध्यापक अमोल ढेपे यांनी केली असून यंदाच्या वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यंदाच्या वर्षी डॉ. जीवन पैकेकरी यांना वैदयकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल, लोकमतचे अप्पासाहेब पाटील यांना प्रामाणिक कार्याबद्दल तसेच निर्मलाताई ठोकळ प्रशालातील शिक्षिका उर्मिला वसंत लंबे, कैलास बब्रुवान शिंदे जि.प. प्रा. शाळा सावळेश्वर व अखिली शिवानंद मोटगी सेवासदन शाळा, सोलापूर यांना शैक्षणिक कार्याबददल तर कविता चव्हाण यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याबददल या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
गौरव चिन्ह प्रमाणपत्र, शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून १० फेब्रुवारी रोजी स. ९.०० वा. हुतात्मा स्फूर्ती मंदिरमध्ये हा वितरण सोहळा होणार आहे. सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते व विश्वकृपा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर ढेपे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्काराचे वितरण होणार आहे अशी माहिती मुख्याध्यापक अमोल ढेपे यांनी दिली.


















