सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके हे पुन्हा दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यांचा पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला आहे मागील पाच महिन्यांपासून विस्कटलेली माध्यमिक शिक्षण विभागाची घडी बसवण्याचे मोठे आव्हान अंधारे यांच्यासमोर असून त्यांनी चार्ज मिळाल्यापासूनच आपल्या कामाला सुरुवात केली आहे कार्यालयातील पेंडिंग फायलींचा निपटारा त्यांनी सुरू केला आहे.
अंधारे यांच्याकडे पदभार आल्याने मध्यामिकच्या अनेक शिक्षक संघटनांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. अंधारे यांनी कार्यालयाची घडी बसवतानाच विद्यार्थ्याचे गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने लक्ष घातले आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव आयोजन केले आहे.
विज्ञान नाटोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि जनसामान्य यांना वैज्ञानिक माहिती, घटना आणि संकल्पना मनारंजक पध्दतीने देता यावा तसेच विज्ञान नाटयातून विज्ञान लोकप्रिय व्हावे, आणि मनोरंजनासोबत समाज प्रबोधन व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येतो. विज्ञानसारखा विषय अधिक रंजक पणे, सहजपणे विद्यार्थ्यांना समजावा, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी विज्ञान नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागात विद्यार्थी गुणवत्तेचा हा दुर्लक्षित केलेला विषय अवघ्या एका दिवसात नियोजन करून राज्यपातळीवर सोलापूरच्या शाळांचे- विद्यार्थ्याचे प्रतिनिधत्व झालेच पाहिजे या ध्यासाने कमीवेळात आयोजन करून नाट्यस्पर्धा उत्साहात घेण्यात आल्या.
शिक्षणाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार या महोत्सवात सहा शाळांनी सहभाग नोंदवला. सुरवसे हायस्कूल महात्मा गांधी मेमोरियल स्कूल जैन दिगंबर प्रशाला, शरदचंद्र पवार प्रशाला, एसव्हिसीएस प्रशाला, श्री स्वामी विवेकानंद प्रशाला यांचा सहभाग होता. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय या ठिकाणी या विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन झाले.
या नाट्यस्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यालयातील विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, स्वाती स्वामी, विज्ञान शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शिवाजी चापले, राजगुरू यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच पर्यवेक्षक म्हणून प्रियंका आराध्ये, सिध्दराम म्हाशाळे व शिरसी मॅडम यांनी काम पाहिले.