सोलापूर : देशात सध्या शारदीय नवरात्र उत्सवाची सर्वत्र धूम आहे. या उत्सवात स्त्री शक्तीचा जागर होतो.
मागील काही वर्षांपासून गरबा दांडिया खेळण्याची महिलांमध्ये क्रेझ वाढली आहे. अतिशय भव्य दिव्य स्वरूपात हे कार्यक्रम सध्या आयोजित केले जात आहेत.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल पतसंस्थेच्यावतीने जुळे सोलापूर परिसरातील भंडारी ग्राउंड वर असाच भव्य दिव्य असा दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शनिवार सायंकाळी सहा वाजता वाजता या दांडिया उत्सवाला सुरुवात होणार आहे. या मैदानावरील आयोजन पाहता अतिशय भव्य दिव्य असे स्वरूप दिसून येते. या दांडिया सोहळ्याचा लाभ सोलापूरकरांनी घ्यावा असे आवाहन लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.