सोलापूर झेडपीचे ‘परमेश्वर ‘ ठरले शेवटच्या टप्प्यात लकी ; सीईओ यांच्या जागेवर बसण्याची संधी
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या सर्वत्र नूतनीकरणाचे काम पाहायला मिळेल. अनेक कार्यालयाचे कायापालट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यामुळे झाले लो आहे. जिल्हा परिषद इमारतीच्या दर्शनी भागासह आतील फरशीकरण तसेच बऱ्याच ठिकाणीं डागडूजी सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेताच आपल्या कार्यालयाची जागा बदलण्याचा निर्णय घेतला. समोरच्या अर्थ विभागाचा ताबा घेताना त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कार्यालय तसेच मीटिंग रूम तयार केले. अर्थ विभागाला त्यांनी वरच्या मजल्यावर पदाधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये काही दिवस ठेवले. आता जिल्हा परिषदेचा अर्थ विभाग समोरच्या भागात असलेला कृषी विभागाच्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आणि कृषी विभाग जुन्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चेंबरच्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.
या कृषी विभागाच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे लोकार्पण मंगळवारी आव्हाळे यांच्या हस्ते होणार आहे. कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे यांचे चेंबर जुन्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी करण्यात आले आहे. ती जागा पूर्वी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी बसण्याची होती आता त्याच जागेवर परमेश्वर वाघमारे वाघमोडे बसणार आहेत.
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे हे येत्या 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. परंतु सेवानिवृत्तीच्या पूर्वी ते लकी ठरले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या ठिकाणी बसत होते त्या ठिकाणी आता वाघमोडे यांना बसण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.